डोसा पुराण.............................

 डोसा सगळ्यांसारखा मलाही आवडतो. नुसता डोसा असतो त्यापेक्षा मस्साला डोसा अशा उच्चरवाने दीला जाणारा डोसा अप्रतिम असतो .

परवापरवा पर्येंत काटा चमच्याने डोसा खाणे मला दिव्य वाटत असे. चमच्याने धरुन काटा ऊभा धरुन ते जमत नसते. शेवटी एक एक छोटा तुकडा तोडून तो संपवावा लागत असे. त्यामुळे पोटात कमी जाऊन बाकीची करसतच जास्त होते.
एका मित्राने काट्याने डोसा खायची प्राॕपर पद्धत सांगीतली. ती म्हणजे चमच्याने डोसा एका बाजूने धरुन काट्याच्या आडव्या बाजूने कापायचा म्हणजे तुकडा करायचा, मग तो सांबार चटणीसह खायचा अशी आहे.
तसे करुन पाहिले. तेंव्हा ते जमले. हैद्राबादला एम. एल. ए. डोसा हा प्रकार गाड्यांवरही मिळतो. तो म्हणजे डोसा अर्धा तयार होत आला की त्यावर उपमा ज्याला आम्ही ऊपीट म्हणतो ते पसरला जाते.
पेपर डोसे, नीर डोसे , पनीर डोसे, स्प्रींग डोसा, टोपी डोसा , असे त्याचे अनंत प्रकार आहेत. डोसा केला जात असता पाहणे सुद्धा आनंददायक असते. तो बल्लव गॕस पेटवून कडाप्पा पाण्याने साफ करतो. तयार पीठ कोठून तरी काढून तव्यावर ठेवून छोट्या वाटीने पसरतो.
तापल्यावर अशी छान पांढरी वाफ व खरपुस वास जवळच्याआसमंतात पसरतो. पहिला डोसा आपल्या दृष्टीने छान झाला असला तरी ऊलथन्याने काढून सरळ टाकून देतो.
तुम्हाला रस असेल तर बल्लव त्याच्या कारागीरीच्या म्हणजे कोणकोणत्या मोठमोठ्या हाॕटेलात पाईव्ह , सेव्हन स्टार मध्ये काम करत होता. आत्ता धंदा मंदी असल्यामुळे कसा या छोट्या दुकानात आला ते ऐकवतो. हो हो छान छान म्हणत ऐकायचे. कोण खरे खोटे करायला बसलेय.
एकदा तो फाॕर्मात आला की एका वेळेला फराफर तीन तीन डोसा टाकतो. ते छान होत आले की त्यात भाजी टाकून फाॕईल मध्ये गुंडाळून चटणी , सांबार पॕक करुन देतो. डोश्यांचे ऊलथन्याने खटाखट आवाज करुन चार तुकडे करतो.
रस्त्यावरचे डोसे करणारे बटर डोश्यासाठी चांगल्या अमुलच्या वेष्टनातुन भरपूर बटर घालतात. येव्हढे लोणी घातले तरी त्याचा कणभरही वास येत नाही. हे स्पेशल बटर त्यांना कोठे , कसे , काय म्हणून मिळते याचा शोध घ्यायला हवा. बरे घरी नेईपर्येंत त्या डोश्यात दम राहिलेला नसतो ना बटरात.
मोठ्या हाॕटेलात मिळणा-या डोश्यांची चैन वेगळीच असते. फक्त किंमत फार सिरीअसली घ्यायची नसते.
आम्ही पटापट डोसे घालतो. कित्ती सोपे झालंय ते. असे ब-याच जणांकडुन ऐकत आलोय. तसा आमच्या घरात एकाही गृहिणीचा पूर्ण डोसा तव्याववरुन निघालेला मी पाहिलेला नाही. त्यामुळे वाईट वाटण्याचे कारणच नव्हते.
डोश्याचा धीरडे हा भाऊ करायला फार सोपा आहे. मी कित्येकवेळा धीरडी केली आहे. तो अनुभव होताच . तसेच तव्यावरील आम्लेट ही अगदी बाळबोध डीश आहे. त्यात तुम्ही चुकूच शकत नाही.
एका संध्याकाळी मी डोसे करण्याचे ठरवले. सगळ्या पदार्थांच्या थिअरीमध्ये मी तरबेज असतो. प्रॕक्टीकल कधीतरी चुकेल येव्हढेच. शिवाय येत असूदे नसूदे आत्मविश्वास भरपूर असतो. त्याचा फायदा असतो. शिवाय आपण न करणाऱ्या विरुद्ध पक्षातील असल्यामुळे येव्हढे करतो याचेच कौतुक असते.
असो. कमी पडायला नको म्हणून चांगले अर्धा किलो डोसे/ईडली तयार पीठ आणले. हे बरे वाटले म्हणजे प्लॕन बी आहे. पीठ पातेल्यात काढले. तवा गरम करायला ठेवला. तेल लावले. स्टायलीत पीठ तव्यावर टाकले. लहान वाटी नव्हती. जरा मोठी वाटी घेतली.
प्रथम पीठ जागा सोडायला तयारच नव्हते. ते जरा दाबून एका बाजूने पसरले. ते पातळ डोश्यासारखे झाले. वाफ आली. परंतु ते/तो तव्यावरुन निघेचना. मग म्हटले नाहीतरी बल्लव पहिला डोसा टाकूनच देतो. टाकायचा कशाला म्हणून खरडून खरडून काढला. असे आणखी दोन चार काढले. पण तेच. ते तव्यापासुन सुटायचा हट्ट सोडेनात. म्हटले जाऊदे त्यांना आणखी त्रास नको.
आता दुसरा प्रयोग करु . जरा जाड घालून ऊत्तप्पा करु. तो सोपा आहे. परत तवा स्वच्छ करुन तापवला. जरा जाड ऊत्तप्पा घातला. त्याला मस्त बुडबुडे आले. जरा फुगू लागला. हळूहळू पण जरा प्रयत्न करुन तो काढला आणि ऊलटा केला. तिथेच चुकले म्हणे.तो सरळ निघेना. जरा वेळाने तोही काढला.
सांबार तयार होतेच. आता काहीतरी करायलाच हवे होते. ईडली पात्र काढले. ऊरलेल्या पिठाच्या ईडल्या घातल्या. फार तर होणार नाहीत ना? जास्त झाल्या तर खाणार कोण. कारण या कृतीला प्रतीसाद द्यायला मित्रही तयार नव्हते.
तरी नऊ ईडल्या झाल्या. छान आहेत म्हणत त्या हळूहळू संपवल्या. यापुढे डोसे करण्याचा फार हट्ट करायचा नाही असे ठरवले. आणखी कोणी अगदी सोपी कृती सुचवेपर्येंत गप्प रहावे हेच बरे.

Comments