कोर्ट ---वास्तू आणि वस्तू ..............................
कोर्टाची वास्तू आणि कोर्टातल्या वस्तू हा लेखाचा विषय. आता एखाद्याला कोर्टाची वास्तू आणि तेथल्या वस्तू यात काय विषेश असणार आहे असे वाटण्याची शक्यता आहे. इतर वास्तूंसारखी वास्तू. पण प्रत्येकाचे या वास्तूकडे पाहणे निरनिराळे असते. म्हणून अनेकांना आपापल्या नजरेने तीच वास्तू वेगवेगळी वाटते. सामान्यतः लोकांना कोर्टाची पायरीसुद्धा चढायला नको वाटते. परंतु सध्याच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना ही पायरी चढावीच लागते. आमचे भाऊ नवीनच साक्ष देणाऱ्याला " या आधी मांडवाखालुन गेला नाहीत वाटते असे ,"म्हणायचे. न्यायदान करणा-यांस हे न्यायाचे मंदिर वाटते. कलाकार जसा रंगमंचावर पाऊल ठेवण्याआधी रंगमंचाला नमस्कार करतात, तसे न्यायाधीश सुद्धा न्यायासनाला नमस्कार करतात. न्यायालयीन कर्मचा-यांना कोर्ट हे आॕफीस असते. वेगवेगळ्या प्रकारचे काम सतत करायचे असते. वेळेची मुर्यादा तर असतेच असते. कोर्ट ही वकीलांची कर्मभूमी असते. बार रुममध्ये त्यांच्या बसण्याच्या ठराविक जागा असतात. परंतु कायम काहीच नसते . ते कोठेही बसून काम करु शकतात. पक्षकारांस दर तारखेस पुढे काय होतयं ही रुखरूख वाढवणारे असते कोर्ट . आपल्...