मुखवटे................................

 डाॕ. आशुतोष राणा हे मुंबईतले म्हणता म्हणता देशातले मोठे प्रस्थ होऊन गेले होते. वय वर्षे पन्नास आणि या माणसाने मानसशास्त्रात अपार संशोधन करुन सर्व सन्मान मिळवले होते.

सकाळी आठला सुरु होणारे डाॕक्टरांचे क्लिनिक रात्री नऊपर्येंत सुरु असे. अधूनमधून डाॕक्टर लेक्चर द्यायला, काॕन्फरन्सेसना, परदेशात जात .
पत्नी डाॕ. आदिती काॕलेजात गणित शिकवत. त्यांचे काम आपले सडेतोड एक घाव दोन तुकडे असे. "काय त्या रुग्णांशी तासंतास बोलत बसता. समस्या ऐकली की ऊत्त्तर देऊन वाटेला लावायच." बरे आहे बाई .तू गणितच शिकव. मानसशास्त्र गणित नाही. दोन आणि दोन चार करायला. इथे दोन आणि दोन पाचही होतात." अशा मजेशीर चर्चा चालायच्या त्यांच्या . काॕलेजात आशुतोषची भाषणे ऐकून आदिती त्याच्यावर फिदा झाली हे कोणाला खरेही वाटत नसे.
डाॕक्टरांचा मित्रपरिवार खूप मोठा. बंगल्यातील व्यवस्था, हिशोब, बिले वगैरे मित्रच पाहून जात. आशुतोषला असली कामे पडू नयेत याकडे सगळ्यांचे लक्ष असे.
रात्रीचे जेवण आटोपून आदिती बेडरुममध्ये झोपायला गेली. आशुतोष त्याचे वाचन, अभ्यास संपवून कधी झोपेल सांगता येत नसे.
ब-याच रुग्णांची मने तपासता तपासता " का हे लोक असे वागतात? आॕफीसात एक चेहरा, तीथे प्रेमळ अगर कडक, घरात वेगळेच, मित्रांपुढे एक, मैत्रिणी असल्यास त्यांच्यापुढे वेगळेच. बरे इकडचे तिकडे समजायचे नाही. " असे विचारत्याच्या मनात सतत येत असत. खरेच आवश्यकता आहे या मुखवट्यांची? काय होईल माणूस मुखवटे काढून खराखरा ऊभा राहिला तर?"
विचार करत करत आशुतोष लाॕनवर फेऱ्या मारत होता. अचानक त्याची नजर घड्याळाकडे गेली. पावणे तीन वाजले होते. आठला क्लिनिक . आता झोपले पाहिजे,असे म्हणत आशुतोष बंगल्यात जाणार, एव्हढ्यात छोट्या गेटवर टकटक आवाज झाला. ही हरीरामची सवय आशुतोषला माहिती होती. आत्ता हरीराम का आलाय? म्हणून आशुतोषने गेट ऊघडले. "सलाम साब! " " सलाम ! बोल क्या है?"एक साधु महाराज आपसे मिलने आये है?"
"मैं नहीं पहचानता, किसीको. ! कल आनेको बोलो!" येव्हढ्यात गेटमधून "बेटा कल किसने देखा है!" म्हणत एक धीप्पाड, गोरेपान , भगवी कफनी घातलेले, लांब पांढरी दाढी, तेजस्वी साधू आशुतोच्या समोरच्या बाकावर बसले.
आशुतोष पहातच राहिला. "बेटा थोडा दुध चाहिये.! " आशुतोषचा महाराज साधुंवर विश्वास नसला तरी सर्वांशी सऋदयतेने वागण्याची समजुत होतीच. त्याने हरीरामला आतुन दुध आणखी खायला काही असल्यास आणायला सांगितले .
साधु आशुतोषकडे पाहू लागले. ती नजर तिक्ष्ण तरी प्रेमळ वाटत होती. तो रुग्णांकडे असाच नजर रोखून पहात असे. "किस ऊलझनमें फसे हो? जानना चाहते हो मनको?"
हे काय चाललेय. आपल्या मनातले ह्यांना कसे कळतेय एक शब्द न बोलता असे त्यास वाटून गेले. तरीही सहज हरायचे नाही असे आशुतोषने ठरवले. "क्या आप जानते है मुझे?" आशुतोष म्हणाला. "बेटा जो लोगोंकी मदद करता है ना ऊसे हम मदद करते है!" ते बोलले.
एव्हढ्यात हरीराम दुध आणि एक सफरचंद घेऊन आला. साधुंनी दुध घेतले. हरीरामला सफरचंद देऊन "बच्चा बीमार है ना तेरा! ऊसे दे!" हरीराम त्यांच्या पायावरच कोसळला. साधुंनी त्याला ऊठवले. जाण्यास सांगितले . तो निघुन गेला.
आशुतोषला आता साधुंशी बोलण्यात रस आला. त्यांनी कफनीतुन एक मुळी काढली व आशुतोषला देत म्हणाले . "पानींमें डालकार पी जाओ! लेकीन याद रहे , ये सबकी बसकी बात नहीं! सभी लोग इतना अच्छा हो नहीं सकेंगे!" जय अल्लख" म्हणत ते ऊठले आणि बाहेर गेलेसुद्धा.
आशुतोष बंगल्यात गेला. किचनमध्ये जाऊन पाणी पीणार येव्हढ्यात त्याला मुळी आठवली. आई मुळी देत असे ते लहानपण आठवले व कट्यावरच पाण्यात ऊगाळून त्याने मुळी चाटली व पाणी पिले.
आता कधी झोप येणार कधी ऊठणार म्हणता म्हणता साधुंचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. त्यात आपण विरघळून जात आहोत असे वाटत क्षणात त्याला झोप लागली.
नेहमीप्रमाणे साडेसातला तो ऊठला तो एकदम फ्रेश होऊनच. आवरुन ब्रेकफास्टला आला. आदितीला वेगळेच वाटले. माझ्याआधी आज हा कसा हजर.
"आदिती मी तुला आज काही सांगणार आहे." नको रे बाबा. मला लेक्चरला पळायचे आहे. संध्याकाळी बोलू.म्हणत ती गेली, " "ठीक आहे. " आशुतोष बोलला आणि आवरुन क्लिनिकला गेला.
आज काम हे काम वाटतच नव्हते. आरशात पहावे तसे स्वतःचे व रुग्णांचे विचार स्पष्ट दिसतच होते.पाच सहा तासांचे काम दोन तीन तासांत संपले. आशुतोष आश्चर्य चकीत झाला.
त्याची ऊत्सुकता वाढू लागली. त्याने मग मुद्दाम एक मित्र सॕम फर्नांडिसला बोलावले. खास ओळखीने साधुने दिलेल्या बुटीचे वैद्यकीय परीक्षण करवले. चार दिवसांनी त्याचे निष्कर्ष आले.
बुटीच्या परीक्षणावरुन आशुतोषने तशाच द्रव्यांच्या गोळ्या तयार केल्या. पण यांचे परीक्षण कराण्यास तयार कोण होणार. शेवटी रिसेप्शनिस्ट जेनी आणि हरकाम्या पांडु त्यास तयार झाले.
दोघांना गोळीचा छोटा छोटा डोस दिला गेला. दोन दिवसांनी जेनी नाचतच कामावर आली. तीने तीचे प्रेमाचे गुपीत जाॕनला सांगितले होते. दोघे जणु काही स्वर्गातच पोचले होते.
पांडुची मात्र हालत खराब होती. त्याची बायको चार दिवसांनी क्लिनिकमध्ये येऊन आरडाओरडाच करु लागली. "हा कसला हा डाॕक्टर. माझ्या संसाराची होळी केली." आशुतोषने तीला बोलावून घेतले व हा एका प्रयोगाचा परिणाम आहे त्याचे बोलणे खरे नाही हे समजावून सांगितले . तेंव्हा कुठे तीचे समाधान झाले.
शेवटी हा प्रयोग सगळ्या मानवाजातीला सारखाच लागू पडणारा नाही हे आशुतोषच्या ध्यानात आले व काही कारणांसाठी सध्याचे परिक्षण बंद केले,
काही दिवसांनी आशुतोषने पुन्हा नवीन संशोधनात्मक अहवाल प्रसिध्द केला की माणसांचे सध्याचे आयुष्यच त्यास अत्यंत ऊपयोगी आहे. जास्त सत्यवादी होणे त्यास परवडणारे नाही.
त्याला पुन्हा सर्वोच्च सन्मान मिळाला. आशुतोष मात्र साधुंची प्रतीक्षा करत राहिला.

Comments