वादळ............................
सुनंदाने आवडीने मुलाचे नाव प्रकाश ठेवले. सगळ्यांनी तीला बरेच चिडवले "हे कसले जुने नाव काढलेस . आता बघ किती छान छान नावे ठेवतात. त्यांचा अर्थसुद्धा कळत नाही. आणी हा काय प्रकाश. " तरीही सुनंदाला प्रकाशच नाव आवडत असे.
तसा तिच्या घरात अंधार नव्हताच. नवरा विजय केमीकल इंजीनिअर होता. हौशी होता. घरात काही कमी नव्हते. पण त्याला कंपनीच्या वेगवेगळ्या कारखान्यांत देखभालीसाठी जावे लागत असे. सुट्या असल्या तर तो सुनंदा आणी प्रकाशलासुद्धा सोबत नेत असे. कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये ते रहात. जवळपासचा परिसर पाहून येत. असे छान चालले होते. प्रकाशची अभ्यासात उत्तम प्रगती चालली होती.
चार पाचचा सुमार. विजय आल्यानंतर गावात फिरायला जायचा बेत ठरला होता. सुनंदा छान आवरुन तयार होत होती. प्रकाशला नवीन पँट, टी.शर्ट घालून हाॕलमध्ये बसवले होते. तेंव्हा तो अडीच वर्षांचा होता.
दुपारचे उन्ह असताना अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. आता पाऊस पडणार अशी चिन्हे दिसत होती. हवा थंड झाली. वारे वाहू लागले. समोरच्या मैदानात वा-याने पाला पाचोळा धूळ जोराने वाहू लागली. त्याचे एक चक्र तयार झाले. वरवर जाऊ लागले.
प्रकाश तो प्रकार प्रथमच पहात होता. आणी अचानक काहीतरी त्याच्या आत काहीतरी झाले. वादळाबरोबर आपल्या आतसुद्धा काहीतरी गरगर जोरात फिरत आहे असे त्याला वाटले. "ममा, ममा. ते बघ . ते बघ. " म्हणत तो कोसळलाच.
सुनंदा आवरुन बाहेर येते तो काय प्रकाश सोफ्याजवळ पडलेला. हातपाय ताठ झालेले. डोळे मिटलेले. तोंडातून उं,उं असा आवाज येत होता. शुद्ध नव्हतीच . तीने झटकन बेल वाजवली. शिपाई आला. त्याने "बाबुला काय झाले?" म्हणत त्याच्या तोंडावर , डोक्यावर पाण्याचे हबकारे मारले. हळूहळू प्रकाश शुद्धीवर आला. ममा ममा करत सुनंदाला चिकटून बसला.
काय करावे सुनंदला कळेचना. तीने फोन करुन विजयला बोलावून घेतले. तो थोड्या वेळाने आला. आता प्रकाश नाॕर्मल झाला होता. त्याला दोघांनी काय झाले विचारले. "काही नाही. वारे आले. " येव्हढेच तो म्हणाला. कशामुळे काय झाले ते सुनंदानेही न पाहिल्यामुळे तीला काही विशेष गंभीर वाटले नाही. ऊशीर झाला असल्यामुळे ते जवळच फिरुन आले. जेवून झोपी गेले.
मध्ये काहीच घडले नाही. काम संपल्यानंतर सगळे गावी आले. दिवस मे महिन्याचे. पाऊस अजून यायचा होता. ऊन्हाळी पाऊस कधीकधी पडतो. एकदा दूपारी प्रकाश घराबाहेर खेळत होता. अचानक वारे वाहू लागले. छोटेसे वादळ मैदानातुन आले आणी प्रकाश घाबरला. आपल्या अंगातुनच भरभर वादळ भीरभीरत आले असे त्याला वाटले आणी तो एकदम खालीच पडला. हालचाल नाही .
सुनंदा प्रकाश कोठे आहे पाहण्यासाठी बाहेर आली , प्रकाश घराबाहेर पडलेला. त्याला काय होत आहे तेच तीला समजेना. परंतु दोन्ही वेळा वादळवारे येते आणी प्रकाशला काहीतरी होते असा अंदाज आला.
विजय आल्यावर दोघे प्रकाशला घेऊन जवळच्याच डाॕक्टरांकडे गेले. त्यांनी काळजीपूर्वक प्रकाशला तपासले. त्याला काही झाले नाही. तो घाबरला होता सांगितले . दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या. त्यांना घाबरण्याचे कारण नाही असेही बजावले.
प्रकाशची शाळा सुरु झाली. त्याला थोडे थोडे काम मिळू लागले. थोडे दिवस रडणे, कंटाळा संपल्यानंतर त्याला शाळा आवडू लागली.
एकदा तीघेजण माॕलमध्ये गेले. खरेदी झाल्यावर तेथेच जेवण व वरच असलेल्या स्क्रीनला सिनेमा असा बेत होता. प्रकाशला सिनेमा आवडत असे. सिनेसा सुरु झाला. अचानक वादळवारे ,पावसातले गाणे सुरु झाले. ते पाहताच प्रकाश "ममा ते आले. नको. नको." असा किंचाळू लागला व बेशुद्ध झाला.
बाकीच्यांना त्रास नको म्हणून ते ऊठले. प्रकाशच्या तोंडावर पाणी मारुन त्याला शुद्धीवर आणले व घरी आले. सुनंदाने विजयला मागील दोन वेळा ख-या वादळाला आणी आत्तातर स्क्रीनवरच्या वादळाला तो कसा घाबरला ते सांगितले .
विजयचा एक मित्र डाॕ. राम मानसशास्त्रज्ञ होता. त्याच्याशी फोनवर बोलल्याव त्याने प्रकाशला घेऊन दोन दिवसांनी संध्याकाळी बोलावले. रामचे क्लिनिक एकदम पाॕश सुंदर होते. दुसऱ्या अपाॕइंटमेंट नव्हत्या.
त्याने प्रथम सगळ्यांशी एकत्र बोलणे केले. नंतर सुनंदा आणी विजयला मागे बसवून प्रकाशशी बोलायला सुरुवात केली. प्रथम त्याची शाळा, मित्र, खेळ याबद्दल विचारत विचारत पाऊस कसा पडतो, वारा कसा येतो, ए.सी. बंद केल्यावर फॕनने वारा कसा येतो ते दाखवले. जोरात वारा आल्यावर काय होते ते विचारले. प्रकाशने सगळे सांगितले परंतु वादळ वारा आल्यावर अंगातुनच काहीतरी काय फिरते ते त्याला कळत होते पण सांगता येत नव्हते.
पुन्हा दोन तीन सिटींग्ज झाल्यानंतर प्रकाशची भिती कमी झाली , तो मोठा होईल तशी ती आणखी कमी होईल असे सांगितले .
परंतु तसे व्हायचे नव्हते. प्रकाश मोठा होत होता. तसे वादळ वा-याचे प्रसंग वर्षात एखाद दुसरेच असत. ते टाळता येत नसत. शाळा संपवून प्रकाश काॕलेजात गेला. वादळ वारे आले की जवळच्या हाॕलमध्ये , हाॕटेलमध्ये जाऊन बसू लागला. तेथे आतला हालण्याचा जोर कमी होत असे पण संपत नसे.
सुनंदाने श्रद्धेने अंगारे, धुपारे, शांतीपाठ सगळे केले. आता प्रकाशच तिची थट्टा करु लागला. पण होणाऱ्यात बदल नव्हता.
काॕलेज संपून त्याला नोकरीचे काॕल येऊ लागले. त्याला आता राजू हा नवा ,आनंदी मित्र मिळाला होते. ते दोघे आपले सगळे विचार शेअर करु लागले. त्याने प्रकाशला, वादळ वारे आल्यावार काय होते ते ऐकले आणी वादळाला धीराने भिडायचे ठरवले.
दोघे मुद्दाम खूप वादळ वारे असते अशा वेळेला एका डोंगरावर गेले. बरोबर चार जवळचे मित्र होतेच. डोंगरावर पोचताच जेवण करुन ते गप्पा मारत बसले. येव्हढ्यात इकडून तिकडून सोसाट्याचे वादळ वारे येऊ लागले. त्यांनी प्रकाशला वादळ एंजाॕय करु सांगितले . वादळ येताच सगळे जोराने नाचू लागले. येतील ती गाणी, येतील तशी ,मोठमोठ्याने म्हणू लागले. प्रकाशला "वादळ वार सुटल रं" गाणे म्हणायचा आग्रह केला.
वादळ वा-याबरोबर त्याच्या आतूनही वादळ हालायला लागले. त्याने जोरात " वादळ वारं सुटल रं. वा-याने तुफान ऊठल रं" चालू केले. पावसाचे थेंब आले. सगळ्यांना भिजवून गेले. आणि प्रकाशच्या अंगातुन येणारे, फिरणारे, त्याला पाडणारे, घाबरवणारे वादळ कुठे विरुन गेले ते समजलेसुद्धा नाही.
खाली आल्यावर मित्रांनी या मोठ्या यशाची जंगी पार्टी केली. आतासुद्धा वादळ येते वारा येतो आणि प्रकाश गाऊ लागतो. " वादळ वारं सुटल रं.." मग ते खरेच निघुन जाते...
Comments
Post a Comment