ट्रेनर्स........................
ट्रेनर्स हे काही विशिष्ठ जातीचे लोक वगैरे नसतात. गैरसमज नसावा. पण हे ट्रेनर्स स्वतःचा एक वर्ग तयार करतात. काही जणांनी ते पाहिले असतील. काहीजण स्वतःही असतील. मी सुद्धा कधीकधी ट्रेनर म्हणून गेलो आहे.
सर्वसामान्य लोकांना ट्रेनर्सचे गुणविशेष कळावे म्हणून हा घाट घातला आहे.
ट्रेनर्स म्हणजे तसे शिक्षकच असतात. पण त्यांच्या जरा वरचे एखादाच विषय शिकवतात म्हणून प्रशिक्षक म्हणू हवे तर.
ट्रेनर होण्याची पहिली अट म्हणजे तुम्ही प्रसिद्ध असले पाहिजे. तुम्ही कधी खात्यातलेच तर कधी बाहेरचे जरा जास्त वाचलेले असता येव्हढेच.
ट्रेनर्स मायबोलीत क्वचितच बोलतात. कमीतकमी इंग्रजी , आता आणखी पुढचे ट्रेनर्स परदेशी भाषाही कदाचित बोलत असतील.
ट्रेनर्स नेहमीचे विषय शिकवत नाहीत. काहीतरी वेगळे शिकवण्यासाठीच त्यांची नेमणूक असते. म्हणजे आॕफीस माॕड्युलेशन, न्यू टेक्नीकस, रीकव्हरी, काँप्युटर युज, अगदी योग शिकवायचा तरी "योगा" "पुराणाज " असे काहीतरी म्हणतात.
ट्रेनींग घेणा-यांसारखे त्यांना दिसून चालत नाही. रोज नवे वाटावेत असे कपडे, ब्रँडेड कधी अगदी विचीत्र रंगबीरंगी वगैरे, तसेच शुज, ग्लासेस, त्यांना घालावे लागतात. ते प्लेनने, गेला बाजार फर्स्टक्लास किंवा सेकंड ए.सी.ने प्रवास करतात. म्हणजे ट्रेनिंगला येता , जाता. एरवी कसे जातात त्यांनाच माहिती .
त्यांना त्यांच्या विषयाची चांगली माहिती असते. शिवाय थोडा व्यायाम, मानसशास्त्र , यांचीही माहिती ठेवावी लागते. मधूनमधून गोष्टी , कूटप्रश्न घालतात. बहुतेक वेळा ते तेच तेच असतात हे दुसऱ्या ट्रेनिंगच्या वेळेसच समजते. तरी ज्यांना माहिती आहे त्यांना ऊत्तर फोडू नका असे इंग्रजीत सांगतात. जसे कोणाला ते कळणारच नाही.
ट्रेनींगला आलेले लोक चार दिवस कामातुन सुट्टी , चार मित्र भेटतात अशा एंजाॕयमेंटच्या मुडमध्ये असतात.
ट्रेनींगला सुरुवात करताना ट्रेनर्स "डोंट टेक एट सिरीअसली. मोस्टली इट वुईल बी अॕन इंटरअॕक्टीव्ह क्लास. आय वुईल सी दॕट एव्हरीवन एंजाॕइज इट." असे मृदुभाषेत सांगतात.
मग स्वतःची सर्व माहिती मुद्दाम सांगतात. बाकीच्यांना थोडक्यात इंट्रो द्यायला सांगतात. ट्रेनींगमध्ये केव्हढे काय शिकवणार ते सांगतात.
हळूहळू विषयप्रवेश. ट्रेनर्स हे ऊत्तम परफाॕर्मर असावेच लागतात. एक एक तासाची दोन तीन सेशन ते सहज पार पाडतात. बरोबर सहकारी किंवा सहकारीणी असेल तर ऊत्तमच असते. म्हणजे मदत होते. तेसुद्धा अधूनमधून काहीकाही सांगतात.
आॕडीओ व्हीज्युअल, क्लीप्स दाखवतात. छोटीछोटी उदाहरणे देतात. त्यांचा विषय आणि ट्रेनिंग म्हणजे आपल्या विश्वातल्या सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे प्रत्येकाला वाटावे असे सांगतात.
कोणीही काहीही उत्तरे दिली तरी त्यांना चालते. मग एकेका शब्दांच्या व्याख्या वगैरे सांगतात. कंटाळा येऊ नये म्हणून रोज दुपारच्या वेळेत विषयासंबंधी खेळ खेळायला लावतात.
बाकी इतर वेळेस खाणे, हिंडणे , फिरणे अशा चैनी सगळ्यांबरोबर त्यांच्याही विशेष चालू असतात.
हळूहळू चार पाच दिवस संपत येतात.बराच पोर्शन राहिला आहे म्हणतात. काहीकाही सांगतात. आलेले परत जायच्या मुडमध्येच असतात. काँटॕक्ट्स दिले घेतले जातात. हाय , हॕलो करुन त्यांचे काम संपते.
अधूनमधून ट्रेनींग असले तरी ते केज , आता एमज, मध्येसुद्धा घेत असतील. कोणाला विचारले कसे झाले ट्रेनींग? "भारी" काय शिकवले? " "काय माहीती. " अशी त-हा होते. प्रत्यक्ष व्यवहारास त्याचा ऊपयोग कमी होतो.
"झाली का तयारी? ते कशाला ?" आता ट्रेनर कसे व्हावे याचे ट्रेनींग क्लास आम्ही लौकरच सुरु करणार आहोत. निमंत्रण आहेच. आठवणीने यायचे बरे का..
Comments
Post a Comment