टि.व्ही. ची मजा...............................

 मुलांना नाविन्यांची आवड असते. तसे आपल्यालाही ते आवडतेच म्हणा. पण आमच्यात शक्यतो काहीतरी भांडण वगैरे झाल्याशिवाय काही हाती येत नाही.

लोक भांडणाला कंटाळतात. स्वतःच्या हक्कासाठी भांडणे आवश्यक असते. त्यासाठी दरवेळी फार पैसे लागतीलच असे नाही. थोडा संयम, वाट पाहण्याची तयारी मात्र लागतेच लागते. ते झाले की यश येतेच.
स्वतःसाठी भांडणा-यास हक्क मिळतो. दुसऱ्यासाठी पैसे घेऊन भांडणारे वकील होतात. दुसऱ्यासाठी स्वतःचे पैसे, वेळ घालवणारे समाजसेवक,राष्ट्रभक्त होतात.
नवीन नवीन किती टि.व्ही. आलेत बाजारात. आता जुना टी.व्ही. कोण वापरतय. असा मुलांचा लकडा सुरु झाला. "ठीक आहे. घेऊया नवा टि.व्ही." म्हटल्यावर मुले खूष झाली.
मग आॕनलाईन का आॕफलाईन ही चर्चा सुरु झाली. आम्हाला आपले सरळ बाजारात जावे. पैसे द्यावे आणि हवी ती वस्तू घेऊन यावी ही पद्धत आवडती. मुलांना बाजारात जावा, तेथे हवी ती वस्तू आहे का पहा, किंमतीत घासाघीस करा यापेक्षा झटकन वस्तू पाहिली, पैसे परस्पर दिले की चार दिवसांनी वस्तू घरात , हा आॕनलाईन प्रकार फारच आवडता.
झाले. एका ऊत्तम कंपनीचा मोठा एल.ई.डी. बत्तीस ईंचांचा टि.व्ही. पसंत केला. आॕर्डर दिली. स्कीममध्ये म्हणून सोळा का पंधरा हजाराचा टि.व्ही. फक्त आठ हजारात मिळणार होता.
"आत्ता मी जातो. तीसरे दिवशी टि.व्ही. येईल. तो तुम्ही घ्या. " सांगून चिरंजीव गेले. तिसरे दिवशी वाट पाहिली. टि.व्ही. आला नाही. असेल काहीतरी अडचण. येईल दोन दिवसांनी म्हणून आम्ही गप्प बसलो.
असेच आणखी चार पाच दिवस गेले. मुलगा गावी जाऊन परतही आला. त्याने ट्रॕक तपासून पाहिला. तर टि.व्ही. मुंबईहून निघुन येणार होता. तो मुंबईहून निघाला होता. पुन्हा चौकशी करता कळले की तो मुंबईहून बेंगलोरला गेला होता. आता तो पुण्याला जाणार होता. कंपन्यांचे हे अजब कारभार काही कळत नव्हते.
दोन दिवसांनी तो बेंगलोरहून निघाला. परत चौकशा, तक्रारी . "येईल, येईल. " मग तीन दिवसांत पोच होणार या आश्वासनाचे काय झाले कोणास ठाऊक . बर पैसे देऊन झालेले. आता परतही मिळाले नसते.
काही दिवसांनी टि.व्ही. पुण्याहून निघाल्याचे शुभ वर्तमान दिसले. वाटले आता संपले. एके दिवशी संध्याकाळी घरात येतो तो टि.व्ही.चे पार्सल येऊन पडले होते.
कष्टाने एक कव्हर , दुसरे कव्हर असे करत सगळे बाहेर काढले. आता टेबलवर ठेऊन सुरु करणार तर मुलाचे लक्ष गेले. "बाबा थांबा. चालू करु नका. "का काय झाले, मी म्हणालो." "पिस डिफेक्टीव्ह आहे. "त्याचे उत्तर.
पाहिले तर टि.व्ही.ची वरची काच का प्लॕस्टीक शाबूत होते परंतु आतला डिस्प्ले मध्येच फुटला होता. एखादा चेंडू आपटल्यावर कसे दिसेल तसा तो दिसत होता. " आता काय करायचे?" असा प्रश्न ऊभा राहीला.
टि.व्ही.चा फोटो काढला. कंझ्युमर सेलला फोन. बराच वेळ झाल्यावर त्यांचे ऊत्तर " कंम्प्लेंट करो! हो जाएगा!" सर्व घटना म्हणजे बुकींगची तारीख , टि.व्ही. येण्यास लागलेला वेळ. त्याची परिस्थिती . मागणी असे लिहीले. दिले पाठवून .
आता त्यांच्या ऊत्तराची वाट. " युअर कंप्लेंट इझ फाॕरवर्डेड." पुन्हा फोन. कंपनीचे नेहमीचे ऊत्तर हो जाएगा! ,त दोन महिने निघुन गेले. पहिले पंधरा , वीस दिवस टि.व्ही. येण्यातच गेले होते.
नशीबाने बुकींग मुलाच्या नावचेच होते. तक्रारी करायला अडचण नव्हती. कंपनीला आठ दिवसात जर नवीन धड टि.व्ही. आला नाही तर योग्य ते ऊपाय करु अशी नोटीस ई. मेल. नेच पाठवली. काही होणार नाही हे माहिती होतेच.
मग व्यवस्थीत प्लॕन करुन ग्राहक मंचात जायचे ठरले. उत्पादक कंपनी , टि.व्ही. आणणारी कंपनी यांच्याविरुद्ध तक्रार तयार केली. तक्रार दाखल केली. योग्य ती नुकसान भरपाई मागितली .
नोटीसा घेतल्या. कंपन्यांना पाठवल्या. आणि आश्चर्य . ज्या बाबीसाठी आम्ही फोन, तक्रारी करुन दमलो तो टि.व्ही. एके दिवशी बारा वाजता हजर झाला.
उघडून चालू करुन बघेपर्येंत माणूस थांबला. टि.व्ही. चांगला लागत होता. " पहिला फूटका टि.व्ही. घेऊन जा." म्हटले तर " ते तुम्ही आणी कंपनी बघुन घ्या ." म्हणाला. शिवाय " ये कंम्प्लेंटका मामला है!" म्हणायला विसरला नाही.
काम झाल्यावर ऊगाच कशाला भांडा म्हणून तक्रार मागे घेतली. टि.व्ही. नेण्याचा खर्च असल्या टि.व्ही. च्या किंमतीपेक्षा जास्त असेल म्हणून कंपनीने पहिला टि.व्ही. ऊचलण्याचे कष्टसुद्धा घेतले नाहीत.
आम्हीच शेवटी तो ऊचलुन माळ्यावर ठेऊन दिला. आता मुले आमच्याबाबत तरी आॕनलाईन खरेदीची बात करत नाहीत आणी आम्ही टी.व्ही.ची.

Comments