बनाना केक ................................

 फळे म्हणून सामान्यांच्या घरात केळीच आणली जातात. सफरचंदे , पीच, पेरी, ड्रॕगन फ्रुट ही फळे आजार होऊ नव्हेत , झाले तर बरे व्हावे म्हणून सांगितलेली श्रीमंती फळे असे मला वाटते. असो.

आणलेली केळी कधीकधी एकदम पिकतात. ती खायला काय त्यांच्याकडे बघायलायही कोणी तयार नसते. ती फेकून द्यायचे जीवावर येते.
मग त्यांचे काहीतरी वेगळे करावेसे वाटते. केळी पोळ्या, पु-या, बन्स, शिकरण, शीरा असे प्रकार होऊ शकतात. त्यापैकी काही प्रकारांनी येव्हढे खाद्यप्रकार तयार होतात की केळी तशीच खाऊन लवकर संपली असती असे वाटते.
पिकलेली केळी सोलून, दोन, दोन तुकडे करुन मिक्सरमधुन काढून घ्यावी. सोबत दोन चमचे साखर घालावी. एक दोन वेलच्यासुद्धा टाकाव्या.
सगळी केळी द्रवरूप करुन घ्यावी. त्यात थोडा रवा किंवा तांदळाचे पिठी, थोडी कणीक घालावी. त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. कणभर सोडा टाकावा.
ग्रील १६० डीग्रीवर सात आठ मीनीटे प्रीहीट करुन घ्यावा. नंतर केळ्यांचे मिश्रण बारा मिनीटे भाजून घ्यावे. मध्येच दहा , अकरा मिनीटांत केक झाल्याचा वास आल्यास हीटींग बंद करावे. थंड झाल्यावर फ्रीझमध्ये किंवा बाहेरच ठेवावा. उलटा करावा. कापावा.
केळ्यांमुळे छान रंग, स्वाद येतो. आणखी काही घालण्याची जरुरी नसते.
मी केक कुकरमध्येच केला. तरी छान झाला.

Comments