मेरी आवाज सूनो........................

 माझी झोप तशी सावध. झोपलेलो असलो तरी तसा जागाच असतो. असे मला वाटते.

नेहमीसारखा झोपलो तरी झोप काही येत नव्हती. शेवटी कधीतरी झोप लागली असावी. अचानक स्वप्न पडल्यासारखे झाले. एक छोटया मुलासारखा दिसणारा पण चेहऱ्याच्यावर अनंत भोगल्याच्या खूणा. हा कोण. तो धडपडत घरात आला आणी खुर्चीवर कोसळला.
तो- "जरा पाणी मिळेल का?"
मी- "हे घे." मी त्याला पाणी दिले.
तो- "पाहिले का?. हे बघा माझ्या अंगावर जागोजागी जखमा झाल्यात. पण बँडेज तिसरीकडेच अंगभर लावलीयेत.कित्ती त्रास होतोय. "
तो- "तू कोण?"
तो- "काय राव. विसरला काय? आज दिवसभर मला शिव्या देताय. अगदी ऐकवेनात म्हणून आलो."
मी- "मी कोणालाच शिव्या देत नाही."
तो- "(हसत) ते चारचौघात . मनात देत असता की. "
मी- "मी कशाला तुला शिव्या देऊ? तू कोण ते सांग आधी. "
तो-" मी रस्ता हो , तुमच्या घरासमोरचा. "
मी-" हां. आत्ता ओळख पटली. जखमा आणी तिसरीकडच्या बँडेजचा अर्थ समजला. पण तसे तर सगळेच तुला सगळेच शिव्या घालत असतात. इकडे का मोर्चा वळवला?"
तो- "तुमची झोप सावध ना. म्हणून आलो.खूप ठिकाणी फिरलो. कोणी दारातूनच हाकलले, काही झोपलेत तर काही झोपेचे सोंग घेत आहेत."
मी- "तुझे वय किती? येवढ्या जखमा तु झेलतोसच कसा?"
तो- "माझे वय तीन वर्षे. माझे वडील , आजोबा पणजोबा खूप जगायचे म्हणे. पण मी आता फार जगायचा नाही."
मी- "का रे बाळा. जगशील की. आम्ही आहोत की तुझी काळजी घ्यायला."
तो-" ( हसत) तुम्ही माझी काय काळजी घेणार हो? तुमच्यामुळेच ही फळे भोगतोय मी. अरे किती गर्दी . किती वाहने. धुळ, घाण अरेरे वाईट वाटते तुम्हा माणसांचे."
मी- "मग तुला बांधणारे काय करतात? त्यांच्याकडे का नाही जात? "
तो- "तेच ते झोपेचे सोंग आणणारे. रस्ते करायचे शास्त्र असतेय म्हणे. पण ते पुस्तकात. ह्यांची पुस्तके वेगळीच असतात. त्यात वाचायला लागत नाही. "
मी- "तुला काय माहित ? येव्हढे ज्ञान सांगायला लागला आहेस. तू तर तीन वर्षाचा पोरगा."तो- "तसे समजू नका हं काका. मी येव्हढासा असलो तरी आमचे भाईबंद सगळ्या जगभर पसरलेत. तुमच्या नेटवर्कसारख आमच नेटवर्क गंडत नाही. "
मी- "ही असली भाषा तू कुठे शिकलास ?"
तो-" तुमचेच ते दादा ताईलोक असेच बोलतात. पण ते समोरासमोर बोलण्यापेक्षा त्या डब्यातच जास्त बोलतात."
मी- "कसला डबा?"
तो- "तो काळा . मोबा का काय म्हटतात."
मी- "अरे तो मोबाईल. बर तुला तुमच्याबद्दल तरी काय माहिती आहे. ? तुझ्या दुर्दशेला जबाबदार कोण?"
तो- "कोण म्हणजे तुम्हीच. ते पुण्यातल तुम्हाला माहिती आहे का?"
मी- "काय?"
तो- "अहो, त्या सोसायटीवाल्यांनी पुस्तकात लिहील्याप्रमाणे आमच्या भावाचा तुकडा घेऊन पाण्यात ठेवला."
मी- "मग काय झाल?"
तो- "काय झाल? अहो तो तुकडा पाण्यात एकवीस दिवस तरी टिकायला हवा , तो चौथे दिवशी विरघळला. मग त्यांनी त्या बनवणा-याला बदलायला लावला. आहे की नाही मजा?"
मी- अरे छान आहे ही आयडिया.
तो- "बर ते प्रकाशकाका माहिती आहेत का तुम्हाला?"
मी- कोण प्रकाशकाका?
तो-"ते लांब असतात नागपूरला का कुठे.त्यांनी मस्त प्लॕस्टीकचे कपडेच घातलेच तिकडच्या भावांना. पण तुमच्याच लोकांनी ते सुद्धा तोडले. कित्ती दिवस रडले ते भाऊ."
मी- "मग ते बांधाणा-यांच्या वरचे साहेब असतात. तीथे जा."
तो- "काही नाही हो. सगळे सगळे सारखे. मस्त कागदापेक्षा पांढरे कपडे घालतात. आणी आमच्या जखमा कळू नयेत म्हणून उंच गाड्या घेतात. एकदा रस्त्यावरन चालू देत मग चांगला खडाच बोचवणारे एकेकेला."
मी- "बर बाबा मला झोप आली. तू पण झोप इथेच."
तो- "काही नको. मी जातो बाहेर झोपायला."
म्हणून तो गेला. मी झटकन जागा झालो. इकडेतिकडे पाहिले. तर कोणीच नाही. खिडकीतून बाहेर पाहिले तर तो छोटा ,हात हलवत टा टा करत झोपला होता.

Comments