गुंतवणूक .................................................
एकवेळ पैसा मिळवणे सोपे आहे परंतु तो योग्य मार्गाने खर्च करुन, साठवून वाढवणे महाकर्मकठीण आहे मला मला वाटते.
लहानपणापासून आपण इतकी वर्षे इतके विषय शिकतो . त्यांचा प्रत्यक्ष आयुष्यात किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय ठरावा. अगदी व्यावसायीक अभ्यासक्रम घेतले तरी काॕलेजात शिकलेली थिअरी आणी प्रत्यक्ष काम त्यातील अडचणी , ज्ञान वेगळेच पडते. त्यामुळेच कधीकधी एखाद्या उत्तम व्यावसायीकापेक्षा चांगली पद्धत रोज ते काम करणारा काढू शकतो.
आर्थिक विषयांचे मात्र तसे नसावे. एरव्ही सल्ला देणारे किती श्रीमंत झाले असते. ते तसे होतातही पण वेगळ्या मार्गाने. शिवाय माझा सल्ला चुकला , नुकसान झाले तर कोणीच कोणाला बांधील नसते.
तर शाळेपासुन प्रत्येकाला साक्षर करण्याबरोबरच अर्थसाक्षर करण्याची जरुरी आहे असे वाटते. महाराष्ट्रात तर ही आवश्यकता जास्तच आहे असे मला वाटते.
म्हणतात ना की पैसे खर्च झालेले चालते पण हिशोब लागला पाहिजे . चार पैसे कमी मिळाले तरी चालेल मुद्दलात घाटा होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. सोलापूरकडे एक म्हण आहे, "व्याजाला सोकला आणी मुदलाला मुकला" . अशी परिस्थिती होऊ शकते.
"तुमची परिस्थिती चांगली आहे. तुम्ही भरपूर पैसे साठवले पाहिजेत. " अशी प्रस्तावना घेऊन चांगले ओळखीचे पुढे येतात. त्यावेळेस घट्ट राहून "पैसे नाहीत. मला तुमचे ऐकायचे नाही. ऊगाच तुमचा वेळ घालवु नका,"असे म्हणता यायला हवे. ते अवघड असते.
मग ते सल्लागार "सध्याची स्कीम किती सुंदर आहे. तीच्यामुळे आपला कसा फायदाच फायदा होणार आहे ," अशी गोड आश्वासने देतात. आपण मग जोरात चेक लिहीतो, व लिहीतच जातो.ते मारे बँकेकडून आलोय , पैसे शेअर मार्केटात गुंतवणार सांगतात.फक्त पाच वर्षे पैसे भरायचे. स्कीम दहा वर्षांची. पाच वर्षे पैसे भरायचे नाही. म्हणजे भरलेले ते वापरणार हे बोलत नाहीत. बरे दहा वर्षांनी आश्वासने देणारे गायब असतात. "पैसे येव्हढेच कसे. दुप्पट होणार म्हटला होता की?". म्हटले तर. "तुमची स्कीम मार्केट रिलेटेड होती ना? मार्केट खाली आले. पैसे खाली आले. " मग त्यांचे मार्केट एक्सपर्ट काय करतात त्यांनाच माहिती .
बरे पैसे ठेवताना आयडेंटिटीचे सगळे कागद घेतात. मग परत आपलेच पैसे आपल्याच खात्यात भरताना कागद कशाला लागतात देव जाणे. बरे येवढे करुन कधीकधी घोटाळे होतातच.
विमा ही एकच गुंतवणुकीची योजना योजना होती तेंव्हा लोक विम्यातच पैसे गुंतवायचे. पण त्याचा फायदा मेल्याशिवाय होत नसे. म्हणजे वारसांनाच व्हायचा. बरे इतक्या वर्षांचे हप्ते पाहिले तर भरलेल्या पैशांपेक्षा कमीच पैसे परत मिळायचे. त्याची इतक्या वर्षांनी किंमत इवलूशी वाटायची.
बरे योजना संपली, एखादा असला जिवंत तर त्यालाच दिलेली पाॕलिसी परत मागतात. बरे मागितली परत तर कँन्सल करुन परतही देत नाही. काहीही मजा लोक करत असतात.
म्युचवल फंड चांगला म्हटले. पण फायदा लगेच नाही. वीस पंचवीस वर्षांनी बोला. तोवर कोण राहिले आहे. परत "मार्केट गेले ना" म्हणायला तयार.
पत संस्था, चिट फंड, वारेमाप आश्वासने , व्याज दर सांगतात लोक भुलतात. पैसे ठेवतात. पुढे त्या बुडवून आश्वासक रिकामे होतात. व्याज गेले, मुद्दलही मिळणे अवघड होऊन बसते.
"शेअर समजुन व्हा. करोडोपती व्हा. ट्रेनिंगला फक्त पाच हजार. " कोण भरतात काय शिकतात. करोडपती होतात का त्यांनाच माहिती .
मी तर घेतलेले गोल्ड बाँडसुद्धा खाली आले म्हणून विकून टाकले. थोडक्यात काय एके ठिकाणी पैसे ठेवुच नयेत. गरजांपुरते ठिकठिकाणी म्हणजे मुद्दल निश्चितच व झाले तर थोडे व्याज हमखास परत मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. ऊरलेले मस्त खर्च करावे. आपलेच पैसे परत मिळण्याच्या त्रासापेक्षा खर्च केल्याचे समाधान तरी मिळेल
Comments
Post a Comment