ग्राहक संरक्षण कायदा,२०१९...
मागील लेखात आपण ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ने , जुन्या कायद्यात कोणकोणते महत्वाचे बदल केले ते पाहीले .आता आपण प्रथम या नवीन कायद्यातील सामान्य ग्राहकास सतत न लागणा-या बाबींचा थोडक्यात परामर्श घेऊ.
नंतर या कायद्याच्या महत्वाच्या बाबींचा हळूहळू विचार करु. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास सतत लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची ओळख होईल.
या कायद्याचा हेतू ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे, कायद्याच्या वेळेत व प्रभावी अंमलबजावणीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी संस्थाची स्थापना करणे व तदनुशंगीक बाबींचा विचार करणे हा आहे.
कायद्याच्या दुसऱ्या विभागामध्ये, ग्राहक संरक्षण परिषद या संस्थेची माहिती कलम ३ ते कलम ९ मध्ये सांगितली आहे. त्यांचे ध्येय ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व प्रचार यासाठी सल्ला देणे हे असते. त्या केंद्रीय , राज्य व जिल्हा स्तरावर काम करतात. त्यांचे सदस्य कोण असतात, त्यांच्या बैठका किती व कशासाठी घेतल्या जातील हे नमूद केले आहे.
कायद्याच्या तिसऱ्या विभागातील कलम १० ते कलम २७ मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण अधीकारी याबद्दल लिहीले आहे. ही संस्था ग्राहकांच्या हक्कांचे ऊल्लंघन,ग्राहकांच्या हक्कांच्या हक्कांच्या विरुद्ध असणाऱ्या , अनुचीत व्यापार प्रथा, फसगत करणाऱ्या जाहीराती, याबाबत ग्राहक वर्गाच्या हक्कांचा प्रसार, संरक्षण व अंमलबजावणी याचे काम करते.
या अधीकारी संस्थेचे काम कसे चालते. तीचे अध्यक्ष कोण असतात, तीचे सदस्य किती वा कोण असतात याबाबत या विभागात माहिती समजते.
या संस्थेचे , तक्रारींची चौकशी करणे , तपास करणे, असे काम चालते. ती जिल्हा स्तरावर जिल्हाधीकारी यास याबाबत चौकशी करुन अहवाल देण्यास सांगू शकते.
कायद्याचा चौथा विभाग आहे ग्राहक वाद निवारण आयोगाचा . हा अर्थात महत्वाचा भाग आहे. त्याचा थोडा सखोल विचार नंतरच्या लेखात आपण करणार आहोत. हा मोठा विभाग आहे. त्यात कलमे आहेत २८ ते ७३.
पाचवा विभाग मध्यस्थी चा आहे.कलमे ७४ ते ८१. त्यात राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग, जिल्हा आयोग येथे मध्यस्थ कक्षअसतील, त्यांचे काम कसे चालते, तेथे वाद कसे मिटवले जातात, मध्यस्थ कोण असतील याचा ऊहापोह केलेला आहे.
सहावा विभाग आहे वस्तूमुळे होणा-या नुकसानाची नुकसान भरपाई देण्याचा कलम ८२ ते कलम ८७ यांचा.
सातव्या विभागात केंद्रीय अधीकारी संस्था यांचे निर्देश न पाळण्याबाबत तसेच फसगत करणा-या जाहिरातींबाबत शिक्षा सांगितल्या आहेत. कलम ८८ ते कलम ९३.
कलम ९४ ते कलम ते शेवटचे कलम १०७ मध्ये संकीर्ण बाबींचा विचार केलेला आहे.
ही माहिती कदाचित किचकट वाटण्याचा संभव आहे. परंतु वर म्हटल्याप्रमाणे यांचा थोडक्यात विचार, माहिती म्हणून करावा अशी विनंती आहे.
Comments
Post a Comment